‘द काश्मीर फाईल्स’ने रचला नवा विक्रम, ‘या’ गोष्टीत ‘ब्रह्मास्त्र’ला टाकले मागे

बॉयकॉट ट्रेन्डचा फटका सध्या बॉलिवूडला बसलेला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सुद्धा बॉयकॉट ट्रेन्डमध्ये होता पण या चित्रपटाने चांगली कमाई करुन दाखवली. या चित्रपटाची ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाशी तुलना केली जातेय. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या एका यादीनुसार ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने एका बाबतीत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला मागे टाकलेले आहे. काश्मिरी पंडितांची व्यथा ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमातून मांडण्या आली होती.
कलाकारांच्या कामाचेही खूप कौतुक झाले. हा चित्रपट भारतातील यावर्षी सर्वात जास्त नफा कमावणारा चित्रपट ठरलेला आहे.‘ब्राह्मस्त्र’ चित्रपटाने १५ दिवसांत जगभरात ३८५ कोटींचा गल्ला जमवला. पण हा चित्रपट तयार करण्यासाठी ४१० कोटी रुपयांचा खर्च आला होता. तर ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १५ ते २५ कोटींमध्ये तयार झालेला आहे आणि त्याची जगभरातील कमाई ३४० कोटींची आहे. तेव्हा इतक्या मोठ्या संख्येने नफा कमवत ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट भारतातील सर्वात जास्त प्रॉफिटेबल चित्रपट बनलेला आहे.