“…च्या डोळ्यात गोठलेले अश्रू सरकारला दिसतील का?”,केंद्रीय समितीच्या अहवालावरून शिवसेनेचा सवाल!

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या स्थायी समितीने जाहीर केलेल्या एका अहवालावरून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात येतोय. कोरोना काळात देशात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात हा अहवाल आहे. यात मोदी सरकारने समस्येकडे दुर्लक्ष केलं असा ठपका ठेवण्यात आलाय. याच मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.
केंद्राच्याच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या स्थायी समितीने कोरोना काळात ऑक्सिजनच्या तुटवडय़ाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले, असा ठपका ठेवला आहे.शिवाय ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीचे ‘ऑडिट’ करून मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्यावी, अशीही शिफारस केली आहे. ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना मृत्यूंबाबत डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारच्या डोळय़ांत समितीने झणझणीत अंजनच घातले आहे. त्याने तरी मोदी सरकारचे डोळे उघडतील का? कोरोनाचे ‘ऑक्सिजन’ बळी हे वास्तव सरकार मान्य करेल का? आता सरकार म्हणून तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात?असा प्रश्न विचारण्यात आलाय.