तुळशीची पाने तोडताना जाणून घ्या ‘हे’ नियम !

तुळस म्हणजे लक्ष्मी असे आपल्याकडे मानतात. सकाळी तुळशीला पाणी घालून तिची मनोभावे पूजा केली जाते. तुळशीचे दैवी आणि आर्युवेदाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. तुळशीची पुजा केल्यामुळे घरात सुख, शांती आणि समाधान येते असे म्हणतात. तुळशीच्या पानांचा उपयोग पुजेसाठी केला जातो. पण तुम्हाला माहित आहेत का तुळशीची पाने तोडताना काही खास नियम सांगितलेले आहेत. तुळशीच्या भोगाशिवाय भगवान विष्णुची पुजा अपूर्ण मानली जाते.
तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा निवास असतो म्हणून तुळशीची पाने तोडताना आधी तुळशीच्या रोपाला नमस्कार करा. तुळशीच्या रोपांची परवानगी घ्या आणि नंतरच तुळशीची पानं पूजेसाठी तोडा.
तुळशीची पाने तोडताना धारधार वस्तूंचा वापर करु नका. जसे की कात्री, चाकू किंवा इतर कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरु नये. जर कोणी तीक्ष्ण वस्तू वापरुन तुळशीची पाने तोडली तर घरात त्या व्यक्तीला दुर्दैवाचा सामना करावा लागतो.
तुळस प्रत्येकाच्या घरात असते.तुळशीला जल देताना एक गोष्ट लक्षात ठेवा तिला रविवारी आणि एकादशीला जल अर्पण करु नये. असे म्हणतात रविवारी आणि एकादशीला तुळस ही विष्णुसाठी उपवास करत असते.
तुळस छतावर लावू नये आणि जिथे तुळस लावली जाते तिच्या आजूबाजूला केरकचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी. तुळशीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळचीची पानंही तोडू नये.