संजय राऊतांकडून ईडीची तक्रार, म्हणाले….

मुंबईमधील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत अधिकच वाढल्या आहेत.आज (४ ऑगस्ट) कोर्टाने संजय राऊत यांची ईडी कोठडी चार दिवसांनी वाढवलेली असून आता राऊत यांना जामीनासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना कोर्टात हजरे केले असता त्यांनी ईडीच्या कोठडीबाबत मोठी तक्रार केली. ‘मला जिथे ठेवलेले आहे तिथे व्हेटिलेशन नाही. माझी मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आहे. मला हृदयविकाराचा त्रास आहे त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आहे. रात्री मला झोपायला जी जागा दिली आहे तिथे ही तशीच परिस्थिती आहे.हवा येण्यासाठी एकही खिडकी तिथे नाही.’ अशी तक्रार राऊत यांनी केली. यासंदर्भात कोर्टाने ईडीला विचारले असता राऊत यांना ठेवण्यात आलेल्या खोलीत एसी असल्याचे सांगितले तसेच त्यांना मोकळी हवा असणाऱ्या खोलीत ठेवण्याची तयारीसुद्धा दर्शविली. कोर्टाने संजय राऊत यांना विचारले ‘तुम्हाला एसी खोलीत ठेवले आहे का?’ त्यावर राऊत म्हणाले, ‘मी पाहिले नाही तिथे फक्त पंखा आहे. मी एसी चालवत नाही मला श्वास घ्यायला त्रास होतो’ असेही राऊत यांनी सांगितले.