‘गुगल’वर ‘हे’ सर्च केलं तर थेट जेलमध्ये जावे लागेल!!

आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल तर आपण काय करतो. गुगलवर ती माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही गुगलवर कोणताही शब्द टाका अवघ्या काही सेकंदात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते.पण तुम्हाला माहित आहे का अशी काही गोष्टी आहेत ज्यांची माहिती तुम्ही शोधली तर तुम्हाला जेलवारी होवू शकते म्हणजे तुमची रवानगी थेट तुरुंगात होवू शकते. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जाणू घ्या. 

१.बॉम्ब कसा बनवावा

तुम्ही बॉम्ब कसा बनवावा असे गुगलवर सर्च केले तर तुमच्या अडचणीत वाढ होवू शकते. केंद्र सरकारने कडक कायदा केला बनवला असून तुम्ही ही गोष्ट सर्च करताना सापडलात तर तुमच्यावर कडक कारवाई होवू शकते अगदी तुम्हाला तुरुंगातसुद्धा जावे लागेल. 

२. चाइल्ड पोर्नोग्राफी

चाइल्ड पोर्नोग्राफी असे शब्द टाकून तुम्ही गुगलवर शोधकाम केलं तर तुमची जेलवारी पक्की आहे असे समजा कारण आपल्या देशात चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधी कडक कायदा करण्यात आलेला आहे. पोस्को अॅक्ट अंतर्गत तुम्ही तुरुंगात जावू शकता. समजा चाइल्ड पोर्नोग्राफी संबंधात माहिती सर्च करताना तुम्ही सापडलात तर तुम्हाला ५ ते ७ वर्षांचा तुरुंगवास होवू शकतो. 

३. गर्भपात

जर तुम्ही गर्भपात अर्थात अबॉर्शन याबाबत गुगलवर सर्च केलं तर तुमच्या अडचणी वाढल्याच म्हणून समजा. कारण भारत सरकारने गर्भपातविरोधात कायदा कठोर केला आहे. ही गोष्ट डॉक्टरांच्या मंजुरीशिवाय शक्य नाही त्यामुळे गुगलवर गर्भपातासंबंधात सर्च करु नये 

या तिन्ही गोष्टी गुगल सर्च वापरताना लक्षात ठेवाव्यात हे आपल्यासाठी योग्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.