शिवसेनेचं नवीन चिन्ह क्रांती घडवून आणेल, तुरुंगातून संजय राऊत यांचा एल्गार !

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेनेत एवढी मोठी उलथापालथ होत असताना ठाकरेंचे फायर फायटर नेते खासदार संजय राऊत तुरुंगात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे तेव्हा सध्याच्या पक्षातील घडामोडीबद्दल त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

शिवसेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. आधी ज्या पक्षांची चिन्हं गोठवली गेली ते पक्ष मोठे झाले आहेत. आम्हीही मोठे होऊ, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी संजय राऊत तुरुंगात आहेत. सध्या राजकारणात ते सक्रिय नसले तरी त्यांचे तुरुंगातूनच राजकीय घडामोडींवर लक्ष आहे.

शिवसेनेत अधिक स्पिरीट असून भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ आणि सेनेचं नवं चिन्ह क्रांती घडवून आणेल. चिन्ह गोठवण्याची वेळ अनेक पक्षांवर आलीय. आधी ज्यांचं चिन्ह गोठवलं गेलं ते पक्ष मोठे झालेत. आम्हीसुद्धा मोठे होऊ असे संजय राऊत म्हणालेत. दरम्यान ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. उद्धव ठाकरे गटाकडून हायोकर्टात रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावर उद्या सुनावणी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.