‘दिशा’नंतर कोणाच्या प्रेमात आहे ‘टायगर’?

अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफमध्ये ब्रेकअप झालं हे तर आपल्याला माहितच आहे. या ब्रेकनंतर टायगरच्या आयुष्यात एक नव्या सौंर्दयवतीने एन्ट्री केली आहे.माहितीनुसार दिशाबरोबर ब्रेकअप झाल्यांनतर टायगर आता आकांशा शर्माला डेट करतो आहे. दिशा आणि टायगर एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते पण काही दिवसांपूर्वीच दोघांचे ब्रेकअप झाले. आता टायगरच्या आयुष्यात आकांशा शर्मा आलेली आहे अशी चर्चा रंगेलली आहे. 

टायगर आणि आकांशाने कॅसनोवा आणि I am disco dancer 2.0 या म्युधिक व्हिडोओत एकत्र काम केलं आहे. त्यांची चांगली केमिस्ट्री त्यात पहायला मिळाली होती. सध्या बीटाऊनमध्ये टायगर आणि आकांशा यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगलेल्या आहेत. आकांशाबद्दल टायगरला प्रश्न विचारला असता हे खरं नाही असे टायगर म्हणालाय.दिशा पटानीच्या ब्रेकअपबद्दल तो काहीही बोलला नाही पण आकांशाबरोबरची रिलेशनशीप ही चर्चा त्यांने फेटाळून लावली. 

आकांशा शर्मा मॉडेल आणि अभिनेत्री असून फिल्म आणि जाहिरातीमध्ये तिने काम केलंय. साऊथ सिनेमात तिने काम केलेलं आहे. महेश बाबू आणि वरुण धवन यांच्यासोबत ती जाहिरातीत झळकली आहे. ती चांगली डान्सरही आहे. तिचे फोटो कायम चर्चेत असतात. आता या नव्या रिलेनशनबद्दल आकांशा काय म्हणते ते पहायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.