अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात आलेला ‘तो’ संशयीत व्यक्ती कोण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतेच मुंबईत येवून गेले. दरम्यान अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आलेली आहे.शाहांच्या दौऱ्या दरम्यान एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत होती. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून हेमंत पवार असं या तरुणाचं नाव आहे. तो धुळ्याचा रहिवासी आहे. हेमंत पवारने आंधप्रदेशमधील खासदाराचा सचिव असल्याचं सांगून अमित शाहा यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी हेमंत पवारला ताब्यात घेतलंय. हेमंत पवारच्या हातात गृहमंत्रालयाचा बँडही होता. तो बँड अधिकृत नव्हता. आता हेमंत पवार कशासाठी तिथे आला होता, अमित शहा यांच्याजवळ जाण्याचे कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान हेमंत पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरही फिरत असल्याचं दिसून आला आहे. हेमंत पवारला 5 दिवसांची पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.