आजी-माजी मुख्यमंत्री भाषणात व्यस्त, भाजपनं साधला डाव !

शिवसेनेत सध्या दोन गट कार्यरत आहेत एक आहे उद्धव ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट. आगामी निवडणुकिसाठी दोन्ही गट जय्यत तयारी करताना दिसत आहेत. या दोन्ही गटांसह सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकिची जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान काल एक मोठी घटना घडली ज्या सर्वात जास्त फायदा भाजपलाच झालेला आहे. 

काल मुंबईत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला तर दुसरीकडे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यमंत्र्यांसोबत मेळावा घेवून पत्रकार परिषद घेतली. दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भाषणं सुरु असतानाच भाजपनं डाव साधला. हा डाव एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना जड जाणार आहे. 

बोईसरचे माजी आमदार विलास तरे आणि पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या उद्धव ठाकरेंनाच नाही तर शिंदे गटालाही हा मोठा धक्का समजला जातो आहे. या दोन नेत्यांमुळे शिवसेनेला पालघर आणि बोईसर मतदार संघात मोठा फटका बसणार असे म्हटले जातेय. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.