उदय सामंत टार्गेटवर? कदमांना इशारा ! ठाकरेंच्या दौऱ्याचा शिंदेंना फटका?

जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि सरकार स्थापन केलंय अगदी तेव्हापासून आदित्य ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेची पुर्नबांधणी करण्यासाठी शिवसंवाद यात्रेसह निष्ठा यात्रेचा धडाका लावलेला आहे. ज्या आमदारांनी बंडखोरी केली तिथे जावून शिवसैनिकांना आपलेसे करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी कंबर कसलीय. आता तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा होणार आहे.
आदित्य ठाकरे यांची संवाद निष्ठा यात्रा १६ सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे रत्नागिरी, चिपळूण, दापोली येथील शिवसैनकांसोबत आदित्य संवाद साधणार आहेत.खासदार विनायकर राऊत, भास्कर जाधव, राजन साळवी आणि कोकणातील बडे नेते यात्रेत सहभागी होणार आहेत.मात्र यामुळे शिंदे गटात गेलेल्या उदय सामंत आणि रामदास कदम यांना थेट चॅलेज असल्याचं बोलल जातंय.
यासंदर्भात बोलताना आमदार साळवी म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर युवासेनाप्रमुख यांनी सिंधुदुर्ग, रायगडसह पश्चिम महाराष्ट्रात दौरे केले. रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा निश्चित झाला असून आदित्य ठाकरे रत्नागिरी, चिपळूण, दापोलीत शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ते सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी विमानतळावर येतील. विमानतळावरुन कारने साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ येतील. तेथे सभा होणार असून आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला रत्नागिरी तालुक्यातील चौदा हजार तर लांजा, राजापूर, संगमेश्वरमधून एक हजारहून अधिक शिवसैनिक येणार आहेत. यावेळी शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असेल. त्यानंतर चिपळूणात त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. दापोलीत दुपारी 4 वाजता संवाद निष्ठा सभा होईल. यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, नेते भास्कर जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.