जिथे झाला हल्ला, तिथेच घेणार जाहीर सभा – उदय सामंत

पुणे येथील कात्रज चौकात शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर गेल्या आठवड्यात हल्ला करण्यात आला होता. ‘त्याच ठिकाणी मी आणि तानाजी सावंत जाहीर सभा घेणार’ असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर होते. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांच्या मतदार संघात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात उदय सामंत सहभागी झाले होते. त्याच दिवशी कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होती. यावेळी कात्रज चौकातून जात असताना आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला यात एकजण जखमी झाला होता. त्याच ठिकाणी उदय सामंत सभा घेणार असून ‘मागून वार करण्यापेक्षा मी तारीख आणि वेळ देणार आहे’ असेही सामंत यांनी सांगितले आहे. रविवारी रत्नागिरीत पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याला प्रत्यत्तर देण्यासाठी .या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सभेमुळे दोन्ही गटातील संघर्ष पुन्हा चिघळणार याची शक्यता आहे.