शिवसेना प्रवक्त्यांची बैठक, संजय राऊतांची जागा कोण घेणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसतो आहे. आपणच खरी शिवसेना हे स्पष्ट करण्यासाठी दौरे, भेटीगाठी यांचे सत्र सुरुच आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झालेली दिसते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (३ ऑगस्ट) रोजी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. शिवसेना प्रवक्त्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काय ठरणार याची उत्सुकता सगळ्यानाच लागली आहे.
दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक होत आहे. संजय राऊत शिवसेना पक्षाची भूमिक दररोज अगदी रोखठोकपणे मांडत होते. पण आता त्यांच्या अटकेनंतर पक्षाची भूमिका कोण मांडणार हा मोठा प्रश्न शिवसेनेकड आहे. दरम्यान आजच्या बैठकित राऊत यांच्या अटकेनंतर पक्षाची भूमिका कोण मांडणार याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ईडीने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेची भक्कम भूमिका कोण मांडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे.संजय राऊत यांच्या अनुपस्थित पक्षाची भूमिका मांडण्यासंदर्भात सर्व प्रवक्त्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन करणार आहेत.