‘मोदी निवडणूक जिंकून देणारे यंत्रमानव’; कश्मीरप्रश्नी आरसा दाखवत ठाकरेंचा ‘सामना’तून सवाल

सामनामधून कायमच विरोधकांवर प्रहार केला जातो. आजच्या सामनात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना चिमटे काढण्यात आलेले आहे. मोदी म्हणजे निवडणूक जिंकणारा यंत्रमानव असे सामनात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये झालेल्या सभेत काश्मीर प्रश्नावरून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. मोदींच्या या भाषणावर बोट ठेवत सामनातून टीका करण्यात आलेली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीका होतच असते पण आज त्यांचे कौतुक देखील पहायला मिळाले आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत याविषयी याविषयी कोणाच्याही मनात शंकाच नाही मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जेवढी माहिती आहे तेवढीच माहीत देशातील घडामोडींविषयी आहे का? असा सडेतोड प्रश्न सामनातून विचारण्यात आलेला आहे. तसेच भाजपने मोदींवा निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवलंय असेदेखील सामनात म्हटले आहे.

मोदी जेव्हा काश्मीर आणि नेहरुंबाबत बोलत होते तेव्हा काश्मीरमध्ये काय सुरू होते? 10 ऑक्टोबरला सकाळपासूनच कश्मिरी पंडित आपल्या सुरक्षेसाठी श्रीनगर आणि इतरत्र रस्त्यांवर उतरले होते. ते केंद्र सरकारविरोधात आक्रोश आणि आंदोलन करत होते. आमचे संरक्षण करा. आम्हाला सुरक्षित स्थळी हलवा असे ओरडून ओरडून सांगत होते. हे सगळं चित्र भयानक आहे असे म्हणत सामनातून ठाकरे यांनी मोदींना खडेबोल सुनावले आहेत.

कश्मीर प्रश्न नेहरूंना सोडविता आला नाही हे मान्य आहे पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली आहे त आणि सत्ता मिळविली आहे. मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची काश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केले? असा परखड सवाल सामनातून करण्यात आलेला आहे. रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान भरभरून बोलतात. पण कश्मीरमध्ये पंडित आणि इतर हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत. पंतप्रधानांपर्यंत ही सत्य माहिती पोहोचू नये याचे आश्चर्य वाटते असेही सामनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.