उद्धव ठाकरेंना ‘ती’ चूक भोवणार ?

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंत शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यात बैठका आणि मेळावे यांचा सपाटा लावला. दरम्यान शिंदे गटाचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून शिवसेनेसाठी ती एक डोकेदुखी ठरते आहे.
हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार घेवून आम्ही वाटचाल करत असून आम्ही खरी शिवसेना आहोत आणि आम्हीच खरे शिवसैनिक आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत. दरम्यान शिंदेगटाकडून करण्यात येणारा दावा केवळ राजकीय रणनीतीचा भाग नसून ती एक वस्तूस्थिती आहे असा दावा शिंदे गटातील आमदाराने केला आहे.प्रतिनिधी मंडळात २८२ जण आहेत त्यातील १७० पेक्षा अधिक प्रतिनिधींचे समर्थन शिंदे गटाला असल्यााच गौप्यस्फोट करण्यात आला आहे. शिंदे गटासाठी ही जमेची बाजू असून शिवसेनेने पक्षाच्या घटनेच्या दुप्पट पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवलेली नाही त्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अनेक नियुक्त्यांबाबत निवडणूक आयोगाला शिवसेनेने कळवलेले नाही. शिवसेनेच्या घटनेच्या विपरित दुप्पट पदांवर नियुक्त्या केल्या असून, निवडणूक आयोगाकडे शिंदे यांचीच सरशी होणार यात वाद नाही असे म्हटले जाते आहे.
शिवसेनेमधील नऊ नेत्यांपैकी एकूण सहा नेत्यांचे एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून तसे पत्रदेखील शिंदे यांच्याकडे आहे. यातील स्वतः एकनाथ शिंदे, रामदास कदम हे दोन नेते असून उर्वरित चार नेते कोण हे देखील योग्यवेळी तुमच्यासमोर येईल असे सांगण्यात येत आहे. शिवसेनमधील १८ उपनेत्यांपैकी ११ उपनेत्यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करत असल्याचाही माहिती या आमदाराने दिलेली आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार जिल्हाध्यक्षांची संख्या ३५ असायला हवी ती ९४ आहे. विभागाध्यक्षांबाबतही तोच प्रकार झालेला आहे.
जिल्हाध्यक्षांची संख्या शिवसेनेच्या घटनेनुसार ३५ हवी तर ती ९४ आहे. तोच प्रकार विभाग अध्यक्षांबाबतही झालेला आहे. शिवसेनेच्या घटेनेच्या हे विपरित आहे. निवडणूक आयोगाकडे या सगळ्या गोष्टी कागदोपत्री पुरावे देऊन मांडल्या जाणार आहेत.