”माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या”

सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची सगळीकडे चर्चा होते आहे. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सत्तांतर, बंडखोरी, महाविकास आघाडीचा प्रयोग असे अनेक प्रश्न विचारले.या पुढील शिवसेनेची भूमिका देखील उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीमधून स्पष्ट केली.
तुम्ही रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना तुमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता अस म्हणत संजय राऊत यांनी बंडखोरी संदर्भात विचारणा केली.यावर उद्धव ठाकरेंनी त्या विषयावर बोलू का? असा प्रश्न विचारला. तसेच मला माझ्या त्या अनुभवातून कुठेही सहानुभुती नको आहे, असेही सांगितले. सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप या मुलाखतीतून करण्यात आला.
या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले आहे की जेव्हा त्यांचे हातपाय हलत नव्हते तेव्हा काही लोकं ते बरे व्हावेत म्हणून देवासमोर अभिषेक करत होते तर काहीजण मात्र त्यांची अवस्था तशीच रहावी म्हणून देव पाण्याच बुडवून बसले होते. आज तेच पक्ष बुडवायला निघाले आहेत असा आरोप देखील ठाकरे यांनी केलाय.