उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचं पत्र पाठलंय. त्यानंतर राजकीय घाडमोडींना जोरदार वेग आला आहे. एकणूच सगळी परिस्थिती पाहता उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. याबाबतच्या दोन महत्त्वाच्या शक्यता सांगितल्या जात आहेत.
नैतिकदृष्ट्या राजीनामा देण्याची शक्यता
राजकीय जाणकारांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उद्धव ठाकरे हे राजकीय पेच दूर व्हावा, यासाठी आधीच राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. त्याचा विचार लक्षात घेता उद्धव ठाकरे हे नैतिकदृष्ट्या राजीनामा देऊ शकतात, असंही सांगितलं जातं. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर सरकार कोसळेल आणि नव्यानं सत्ता स्थापनेचा दावा हा राज्यपालांकडे केला जाऊ शकतो. मात्र असं झाल्यास विशेष अधिवेशनातील अग्निपरीक्षा टळेल.
सरकार अल्पमतात
मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत लढण्याचा निश्चय केला होता. वेळोवेळी बहुमत चाचणीला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशा आशयाची वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं. ‘सभागृहात माझ्याविरोधात माझ्याच माणसांकडून मतदान होणं ही माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट असेल त्याआधीच मी राजीनामा देतो,’ असं ते म्हणाले होते.
त्यानंतर बंडखोर आमदार आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष ताणला गेला. प्रखर वक्तव्य केली होती. चर्चा फिस्कटलेली. त्यानंतरही बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारनं घेतली होती. त्यामुळे शेवटपर्यंत संघर्ष करुनही जर बहुमत सिद्ध करता आलं नाही, तर सरकार कोसळणार आहे.पर्यायानं उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागेल.