उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा टीझर पाहिला का ?

महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा बदल आपल्याला पहायला मिळाला. या सगळ्या सत्तासंर्घषाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत काय आहे किंवा भविष्यात शिवसेनेची वाटचाल कशी असेल असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत.यासंदर्भात सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा टीझर सोमवारी (२५ जुलै) रोजी रिलीज करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हा टीझर सगळ्यांसमोर आणला आहे.
या टीझरमध्ये संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, हम दो एक कमरे में बंद हो असं सध्याचं सरकार आहे.या टीझरला पाहता ही मुलाखत नक्कीच वादळी होणार यात शंकाच नाही.उद्धव ठाकरे राजीनामा द्यायला तयार होते का तसेच विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते तर काय झाले असते या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत असे सांगण्यात येते आहे. २६ आणि २७ जुलैला ही मुलाखत रिलीज होणार आहे.
दरम्यान काल (२४ जुलै) या मुलाखतीचा पहिला टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना राजकीय स्थितीबाबत प्रश्न विचारताना दिसत आहेत.आपलं नक्की काय चुकलं की महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला अशा प्रश्नांचा यात समावेश आहे. राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरे आपल्या ठाकरी शैलीत उत्तर देताना पहायला मिळत आहेत. २६ आणि २७ जुलैला ही मुलाखत आपल्या सगळ्यांना पहायला मिळणार आहे.