उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर पाहिला का?

गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात मोठं सत्तांतर आपल्याला पहायला मिळालं. आता शिवसेनेत उघड उघड दोन गट पडलेले दिसत आहेत. या सर्व राजकीय परिस्थितीवर देशभरातून प्रतिक्रिया आल्या पण खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत याकडे जनतेचे लक्ष लागले होते. आता उद्धव ठाकरें जनतेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. शिवसेनेच मुखपत्र असणाऱ्या सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली असून २६ आणि २७ जुलै रोजी ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीचा टीझर प्रदर्शित झालेला आहे. संजय राऊत यांनी ट्विटर अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे.
मुलाखतीच्या टीझरमध्ये आमदारांची बंडखोरी, हल्लाबोल, सुड आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळत आहेत. धनुष्यबाणासाठी शिवसेनेला पुरावे द्यावे लागत आहेत असा रोखठोक प्रश्न विचारण्यात आला आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे त्यामुळे सगळ्यांचे लक्ष उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लागले आहे. दरम्यान या टीझरमुळे सगळ्यांच्या उत्सूकता वाढलेल्या आहेत.