शिंदेगटाची ‘ती’ मागणी उद्धव ठाकरेंनी केली पूर्ण !

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आरोप-प्रत्योरोप पहायला मिळाले. बंडखोर आमदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडतोड टीका करण्यात आली. दरम्याना मुलाखतीच्या शेवटी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला, ‘जे फुटीर लोक आहेत त्यांनी आपल्याला विनंती केली आहे की त्यांना गद्दार म्हणू नका.’
या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता मी त्यांना गद्दार कुठे बोललो, त्यांना विश्वासघातकी बोलतो आहे.विश्वासघातकी हाच शब्द वापरला आहे मी. त्यांचापण मान ठेवला मी म्हणून त्यांना विश्वासघातकी बोललो गद्दार नाही.’
बंडखोर शिंदेगट नेहमी असे म्हणत आहे, ‘आम्हाला बंडखोर म्हणू नका. आम्ही बंडखोरी केलेली नाही. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही लढत आहोत.’ बंडखोर गटाची ही मागणी अखेर शिवसेना पश्रप्रमुख यांनी मान्य केली आहे. ‘आता मी त्यांना बंडखोर म्हणत नाही तर विश्वासघातकी म्हणतो आहे. या मुलाखतीत त्यांचा उल्लेख विश्वासघातकी असाच केलेला आहे. त्यांचा मान मी ठेवला’ असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.