दसरा मेळावा : उद्धव ठाकरे यांना ‘मनसे’चे ८ प्रश्न !

दसरा मेळावा आता अगदी काही तासांवर आलाय. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच शिवेसेनेच दोन दसरा मेळावे होत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दसरा मेळावा प्रश्न खूप गाजला होता. आता या दसरा मेळाव्यानिमित्त मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून ठाकरेंना आठ प्रश्न विचारण्यात आले आहेत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” हे म्हणण्याचा अधिकार नाही अशी टीकासुद्धा यात करण्यात आलेली आहे.

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी हे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलंय त्यात पत्रात ठाकरेंना विचारण्यात आलेले आठ प्रश्न आहेत. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली? आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं? अशा प्रश्नांचा उल्लेख यात करण्यात आलेला आहे.

साहजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही, असं म्हणत या पत्राची सांगता करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.