चौकशीची पिडा टळली, पाटणकरांना CBI कडून दिलासा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआय न्यायलायकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणकरांशी संबंधित ८४.६ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे. फसवणूक प्रकरणाशी संबंधित सबळ पुरावे उपलब्ध नसल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. त्यामुळे ईडी ही मातोश्रीपर्यंत पोहोचली अशी चर्चा रंगली होती. पण, आता सत्तेतून पाय उतार होताच उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे. CBI ने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर झाला असून यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या बाबतीत कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यांचा थेट सहभाग गैर व्यवहारात आढळले नाहीत, असं नमूद करण्यात आले आहे.
किरीट सोमय्या यांचा आरोप
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर खोचक टीका केली होती. “उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. शेल कंपन्यांच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून त्यासंदर्भात ईडीनं मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. घोटाळेबाजांना सोडणार नाही”, असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं होतं. श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. यात २९ कोटी काळा पैसा गुंतवला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या कंपनीचा आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? हे ठाकरेंनी स्पष्ट करावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.