सेनेचं ठरलं, तेजस ठाकरेंकडे मोठी जबाबदारी? मुहूर्तही ठरला?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली त्यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट तयार झाले आहेत. आम्हीच खरी शिवसेना असे म्हणत दोन्ही गट कोर्टात गेले आहेत मात्र निर्णय अजून प्रलंबित आहे. आता शिंदे गट आणि ठाकरे गट असाच विचार करण्याची वेळ आलेली आहे.
शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेवून वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच खरे हिंदुत्वाचा विचार करणारे शिवसैनिक आणि शिवसेना हा नारा दिला. तर दुसरीकडे शिवसेना म्हणजे मातोश्री, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे असा नारा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांनी दिलाय. आता असे सगळे असताना आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दसरा मेळावा. दोन्ही गट एकमेकांना आव्हान देत असताना दोघांसाठी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणे फार महत्त्वाचे आहे.
आता शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणात्या गटाला परवानगी मिळते ते येत्या काही दिवसात समजेल. पण शिवसेना शिवाजी पार्क मैदानासाठी उच्च न्यायायलयात गेलेली आहे. तर शिंदे सुद्धा शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेता याव यासाठी प्रयत्न करत आहेत. आता या सगळ्यात अजून एक चर्चा सुरु आहे ती म्हणजे तेजस उद्धव ठाकरे यांची. आदित्य ठाकरेंचा लहान भाऊ ठाकरे राजकारणात सक्रिय होणार का शिवसेनेच्या पडत्या काळात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पक्षासाठी काम करणार का असा सवाल आता शिवसैनिक पुन्हा विचारू लागले आहेत.
यासाठी कारण ठरलं आहे एक पोस्टर जे सोशल मीडियावर व्हायरल होतंय. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्याच्यासोबत तेजस ठाकरेचा फोटो देखील देण्यात आलाय. खरंतर हे पहिल्यांदा घडलेल नाही कारण याआधीसुद्धा अशी पोस्टरबाजी पहायला मिळालेली आहे. गणेशोत्सावाच्या काळात गिरगावात युवाशक्ती म्हणून ठाकरे कुटुंबासह तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र आता जेव्हा शिवसेनेचा पडता काळ आहे तेव्हा तेजस ठाकरे यांची खरोखर राजकारणात एन्ट्री होणार का दसरा मेळावा हाच तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीचा मुर्हुत आहे का अशा चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत.