फडणवीसांनी शिंदे-ठाकरेंच्या भाषणाची कशी केली तुलना?

उद्धव ठाकरेंचा मेळावा म्हणजे शिमगा होता. शिमग्याबाबत काय बोलायचं? शिमग्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नसते त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मी काहीही बोलणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे.काल झालेल्या दसरा मेळाव्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले होते. दोन्ही मेळाव्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला जी गर्दी झाली होती त्यामुळे खऱी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे सिद्ध झालं असेही फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले.

मी दसऱ्याच्या दिवशी नागपूरमध्ये होतो. मी दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली नाही. पण भाषणांचा थोडा थोडा सारांश ऐकला. पण मी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. याचं कारण म्हणजे शिमग्यावर काय बोलणार? उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे शिमगा होता. त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज मला वाटत नाही असा टोला फडणवीस यांनी लगावला.

बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्क मैदानापेक्ष दुप्पट आहे आणि ते मैदान संपूर्ण भरलं होतं त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे हे महाराष्ट्राला समजलं असंही एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो असेही फडणवीस म्हणाले. निवडणूक कोणतीही असो त्यात भगवाच फडकणार, हा भगवा झेंडा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.