उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पराभूत झालेल्या आमदारांची बैठकी घेतली होती. या बैठकीत पराभूत झालेल्या आमदारांनी निवडणुकीत त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांकडून मदत न मिळाल्याचे आरोप केले, तसेच महाविकास आघाडीतुन बाहेर पडण्याची इच्छा देखील अनेकांनी व्यक्त केली त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे खरच महविकास आघाडी मधून बाहेर पडणार का? त्याचे फायदे, तोटे किती असणार? तेच जाणून घेऊयात
सर्वात पहिलं बोलूयात महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर ठाकरे यांना काय नुकसान होईल याबाबत, तर महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर ठाकरेंना होणार पहिल नुकसान म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा गमावणे. लोकसभा व विधानसभेत ठाकरे गटाला मिळालेल्या विजयामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीचा फार मोठा वाटा आहे आणि ठाकरे जर महाविकास आघाडीतून बाहेर पडले तर आगामी काळात येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळणार नाही.
ठाकरे गटाला होणारा दुसरा तोटा म्हणजे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर त्यांच्यावर अनेक आरोप होऊ शकतात. 2019 ला मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी महा विकास आघाडी चा प्रयोग केला, त्यानंतर लोकसभेला ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट कमी होता मात्र तरी देखील त्यांनी महाविकास आघाडी सोबत राहणं पसंत केलं आणि आता विधानसभेला जेव्हा ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, अशा वेळेस जर उद्धव ठाकरे महा विकास आघाडीतून बाहेर पडले तर त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता असे अनेक आरोप त्यांच्यावर होऊ शकतात
मात्र या तोट्यां सोबतच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे ठाकरे यांना काही फायदे देखील होऊ शकतात. त्यातील सर्वात पहिला फायदा म्हणजे हिंदुत्वाचा, शिवसेना हा मूळ हिंदुत्वादी विचारांचा पक्ष मात्र ठाकरे यांनी महाविकास आघाडी मध्ये सामील झाल्या नंतर त्यांना स्पष्टपणे हिंदुत्ववादी भूमिका घेता आली नव्हती. पण ठाकरे जर आता महाआघाडीतून बाहेर पडले तर ते पुन्हा एकदा ठामठोकपणे त्यांची हिंदुत्वाची भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे मतदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळू शकतात. सोबतच विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर केले जाणारे अनेक आरोप देखील त्यांना खोडता येतील.
शिवसेना ठाकरे गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अनेक उमेदवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आत्ता जर उद्धव ठाकरे महा विकास आघाडी मधून बाहेर पडले, तर उद्धव ठाकरे हे पक्षातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा व त्यांच्या शब्दाचा मान ठेवतात असा संदेश पूर्ण पक्षातील कार्यकर्त्यांन मध्ये जाऊ शकतो. ज्याचा फायदा उठाव ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल. विशेष करून मुंबईत. व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना नागरिकांचा पाठिंबा पाठिंबा देखील मिळेल. त्यासोबतच या निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या यशावरून उद्धव ठाकरे गटाला त्यांच्या ताकतीचा अंदाज देखील येईल. ज्याचा फायदा त्यांना पुढची दिशा ठरवताना होऊ शकतो.
यासोबतच महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत किंबहुना महायुती सोबत जाण्याची द्वारे खुली असतील अशा वेळेस ते पुन्हा भाजपा सोबत जाणार का या चर्चा जोर धरू शकतात. व एकूणच मागील पूर्ण काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपाविरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे फक्त या चर्चांचा देखील उद्धव ठाकरे यांना फटका बसू शकतो. किंबहुना उद्धव ठाकरे यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे असा आरोप देखील त्यांच्यावर केला जाऊ शकतो.
महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडले तर त्यांना काही ठिकाणी फायदा होईल तर काही ठिकाणी नुकसान असं चित्र सध्या दिसून येतंय. मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांनी याबद्दल कोणतही भाष्य केलं नसल्याने सध्या तरी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की नाही या फक्त चर्चा आहेत. तर तुम्हाला काय वाटत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडाव कि नाही ते आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा.