ऐकावे ते नवलच ! बाळाचे नाव ठेवले पकोडा कारण…

प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपल्या मुलांचे नाव हटके असावे. त्यामुळे जेव्हा मुलाचे बारसे असते तेव्हा नावासाठी खूप रिसर्च करणारे देखील कमी नाही. आज बाळाच्या नावाची चर्चा होतेय कारण सोशल मीडियावर एका बाळाचे नाव व्हायरल झाले आहे. एका ब्रिटीश दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव ‘पकोडा’ (Pakora) म्हणजेच भजी असे ठेवले आहे. तुम्हाला वाचून हे आर्श्चय वाटलं असेल पण हे खरं आहे.
एका ब्रिटीश दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव चक्क भारतीय पदार्थावरुन ठेवले आहे. वृत्तसंस्था ANI ही बातमी दिलेली आहे. या दाम्प्त्याला पकोडा नाव खूप आवडलं म्हणून त्यांनी बाळाचे नाव पकोड ठेवले. आयर्लंडमधील न्यूटाऊनएबी शहरात एक प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. ज्याचे नाव कॅप्टन टेबल असे आहे. रेस्टॉरंटने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका माहिती म्हटले आहे की, एका जोडप्याने आपल्या हॉटेलमधील पदार्थावरुन आपल्या बाळाचे नाव ठेवले आहे. हा पदार्थ आहे पकोडा. या रेस्टॉरंटने आपल्या बाळाचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेटकऱ्यांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजणांना हे नाव खूपच आवडले आहे तर काहींनी प्रश्न विचारला आहे असे कसे विचित्र नाव ठेवावे वाटले. एकूणच हटके नावामुळे पकोडा बाळाची जगभरात चर्चा होतेय.