8 चित्ते भारताला महागात पडणार? चित्त्यांच्या बदल्यात नामिबियानं मौल्यवान वस्तू मागितली

नामिबियातून ८ चित्ते गेल्या महिन्यात भारतात आणण्यात आले. या चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. दिवसभर सोशल मीडियासह सगळीकडे चित्ता हाच विषय गाजत होता. पण हे चित्ते भारताला महागात पडणार असेच दिसते आहे. नामिबियातील चित्ते भारतात आणण्यासाठी करार झालेला आहे. भारत जैवविविधता क्षेत्रात काम करेल आणि या मुद्द्यांवर CITESच्या बैठकीतही सहमती जाहीर करेल असे मुद्दे करारात होते.आता नामिबियातून चित्ते भारतात आले. ते देताना नामिबीया आणि भारतात करार झाला आता त्यामधील अटींची पूर्तता भारताला करावी लागेल.
दोन्ही देशांमधील करारात हस्तीदंत हा शब्द वापरण्यात आलेला नव्हता पण नामिबियाने CITESच्या अंतर्गत हस्तीदंताच्या व्यापाराबद्दल भारताचा पाठिंबा मागितलेला यामुळे वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. नामिबिया, दक्षिण आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणात हस्तीदंताचा व्यापार चालतो. पण भारतात १९८० पासून हस्तीदंताच्या व्यापारावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र आता नोव्हेंबरमध्ये CITESची बैठक होत आहे तिथे भारत आपली भूमिका बदलू शकतो आणि नामिबियाने दिलेल्या चित्त्यांच्या बदल्यात त्यांच्या बाजूने निर्णय घेऊ शकतो.
पुढील महिन्यात मध्य अमेरिकेतील पनामात CITESची बैठक होतेय. त्यात हस्तीदंताच्या व्यापाराबद्दल भारत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. समजा भारताने नामिबियाच्या बाजून भूमिका घेतली तर हा एक महत्त्वपूर्ण बदल मानण्यात येईल असे नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफचे सदस्य रमन सुकुमार म्हणालेत. तर सामंजस्य कराराच्या अंतर्गत हे करण्यात येते आहे. भारतानं आमची साथ दिल्यास आमची बाजू आणखी मजबूत होईल असे नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाचे म्हणणे आहे, आता पुढे काय होते ते कळलेच.