काय म्हणावं आता ! तुम्हीच पाहा काय झाले ते?

सोशल मीडियावर अनेक व्हिडोओ दररोज व्हायरल होत असतात मात्र सध्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष सगळ्यात जास्त प्रमाणात वेधलेले आहे.खरंतर हा व्हिडोओ तुम्हाला तुफान हसविणारा असाच आहे. एक पोलीस अधिकाऱ्याची ब्लड सँपल देताना उडालेली भंबेरी, त्याचा आकांडतांडव पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत.
एखादं लहान मुलं इंजेक्शनची सुई पाहिली की घाबरतं. मला इंजेक्शन नको किंवा सुई पाहून लहान मुलं दूर पळत असतात. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला इंजेक्शन पाहून जोरजोरात रडताना आणि पळताना तुम्ही पाहिले आहे का आणि ते सुद्धा एका पोलिस अधिकाऱ्याला हे सगळं वाचताना तुम्हाला आर्श्चय वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा तुम्हाला खरं काय आहे ते समजेल.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेश येथील आहे. उन्नाव येथे पोलिसांचा ट्रेनिंग कँम्प सुरु आहे तिथे मेडिकल टेस्टसाठी ब्लड घेणे सुरु होते. त्यावेळी आरोग्य अधिकारी एका पोलीस कर्मचाऱ्याचे ब्वड टेस्ट घेण्यासाठी गेले. ते ब्लड टेस्टची तयारी करत असताना त्या पोलिसाने डॉक्टरांच्या हातात इंजेक्शनची सुई पाहिली आणि ते जोरजोरात रडायला लागले. इंजेक्शनला घाबरून ते पोलीस अधिकारी विनवणी करत आहेत असेही त्या व्हिडीओत पहायला मिळते आहे.हा मजेदार व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर कमेंटचा पाऊस पडतोय.