फ्रीचे दिवस संपले? आता UPI पेमेंटवरदेखील चार्ज लागणार, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत !

UPI अर्थात यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेसचा वापर आपल्या देशात अगदी सर्रासपणे केला जातो आहे. अगदी १० रुपयांची वस्तू खरेदी केली तरी थेट मोबाईद्वारे पैसे पे करणाऱ्यांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढते आहे. UPI द्वारे पेमेंट करणे आपल्याकडे यशस्वी झाले कारण यूजरला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही पण आता लवकरच या नियमात बदल होणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आता UPI पेमेंट्सवर शुल्क आकारण्याचा विचार करते आहे. आपण काहीही खरेदी केले की सर्रास डिजीटल पेमेंट करतो परंतु आता लवकरच या पेमेंटवर काही रक्कम चुकवावी लागू शकते. याचा उद्देश यूपीआयची गुंतवणूक आणि संचालनासाठी लागणारा पैसा वसूल करण्याची शक्यता आहे.आरबीआयने सल्ला दिला आहे की, यूपीआय पेमेंटवर वेगवेगळे रक्कम ब्रेकेटच्या आधारावर एक टियर चार्ज लावला जावू शकतो. आरबीआय ही रक्क ग्राहकांकडून वसूल करू पाहते आहे.