फोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय? ‘असं’ Deactivate करा UPI अकाऊंट

कोरोना काळात डिजिटल पेमेंटचा वापर हा आता प्रत्येकजण करत आहे. डिजिटल पेमेंट पर्यायामुळे व्यवहार करण्यात खूप मोठी मदत झाली. लोक खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करतात. कारण, मोबाईल वापरून UPI पेमेंट करणं सोपं आहे. UPI पेमेंट पर्यायासह, तुमच्या खिशात पैसे ठेवण्याची गरज संपलीच आहे. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही मोठ्या मॉल्सपासून ते छोट्या किराणा दुकानामध्ये याच्या माध्यमातून खरेदी करू शकता.

कधी घाईगडबडीत जर तुमचा मोबाईल कुठेतरी हरविला आणि तो चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला तर ते तुमचे Bank Account देखील रिकामे करू शकतात. म्हणूनच UPI Payments वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुम्ही UPI खाते सहजपणे कसे डीएक्टीव्हेट करू शकता हे जाणून घेऊया.

जर तुमचा फोन हरवला असेल किंवा कुणी चोरला असेल तर सीम कार्ड कंपनीच्या कस्टमर केअरला लगेच फोन करावा. त्या अधिकाऱ्याला फोन गहाळ झाल्याची माहिती देऊन सीम कार्ड ब्लॉक करायला सांगावं. कस्टमर केअर अधिकारी तुमच्या मोबाईल नंबरद्वारे तयार केल्या जाईल अशा युपीआय (UPI) पिन बनवण्यास प्रतिबंध करेल. सिम ब्लॉक करण्यासाठी, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, बिलिंग पत्ता, शेवटचे रिचार्ज तपशील, ईमेल आयडी इत्यादी तपशील विचारू शकतात.

यानंतर त्वरित आपल्या बँकेत फोन करून तुमचा फोन हरवला असून युपीआय सेवा बंद करण्याबद्दल व बँक खाते गोठवण्याबद्दल बँकेला सांगावं. फोन हरवला आहे अशी पोलिसांत तक्रार दाखल करावी. कारण नवीन सीम कार्ड घेतल्यानंतर आपण पुन्हा या पोलीस तक्रारीच्या मदतीने पुन्हा बँकेकडून सुविधा प्राप्त करू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.