प्रतापराव जाधव घाबरले? 100 कोटींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटले

शिवसेनेत मोठी फूट पाडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले याला आता 4 महिने होत आले. प्रथमतः उध्दव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका न करण्याचा निर्णय घेणाऱ्या बंडखोर आमदारांनी आता थेट उध्दव ठाकरेंनाच टार्गेट करण्याचा चंग बांधला आहे.
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी नुकतेच उध्दव ठाकरेंवर 100 कोटी दर महिन्याला घेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. पण आता यावर प्रतापराव यांनी घुमजाव करत मी अस बोललो नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव म्हणतात, ठाकरेंनी वाझे ची पाठराखण केली अस मी म्हणालो होतो पण माध्यमांनी माझ्या बोलण्याचा अर्थ चुकीचा काढला आहे. त्याच्या या सारवा सारवी नंतर जाधव कुणाला घाबरले याची जोरदार चर्चा चालू आहे.