‘हे’ शो पीस तुमच्या घर आहेत..आजच काढून टाका अन्यथा..

प्रत्येकाला वाटत असते आपले घर छान, सुंदर असावे त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. वेगवेगळ्या वस्तू आणून घरात सजावट केली जाते. प्रामुख्याने आपण शो पीस आणून सजावट करतात पण तुम्ही आणलेले शो पीस घरात सकारात्मर ऊर्जा घेवून येत आहेत का किंवा ते शो पीस योग्य आहेत का ते आपण या लेखात पाहणार आहोत.
अनेकदा आपण घराची सजावट करताना अशा काही गोष्टी खरेदी करतो की ज्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होवू शकतो. जर तुमच्या घरात तीन गोष्टी शो पीस म्हणून असतील तर ते अशुभ मानलं जातं.
काटेरी झाडे
घरात काटेरी झाडे ठेवू नका त्यामुळे वास्तू बिघडते. घरात नकारात्मक ऊर्जा येते. गुलाब, निवडुंग किंवा काटेरी झाडे आकर्षक दिसतात मात्र ही काटेर झाडे घरात ठेवणे प्रामुख्याने टाळायला हवे.
हिंसक फोटो
पेंटिंग्ज घरात लावण्याची आवड सगळ्यांना असते पण घरात कोणतेही पेंटिंग्ज लावणे योग्य नाही. सिंह, वाघ, चित्ता, अस्वल या सारख्या जंगली प्राण्यांचे पेंटिंग्ज घरात लावणे टाळावे. एखादी दुःखद घटना दाखविणारे फोटो घरात लावणे टाळावे. यामुळे घरात नकारात्मक आणि निराशाजनक वातावरण राहते.
नटराजाची मूर्ती
शिवशंकर यांचा एक अवतार म्हणजे नटराज होय. भगवान शिव यांनी जेव्हा तांडव केला तेव्हा नटराज रुपाची उत्पत्ती झाली. शंभो महादेव जेव्हा क्रोधीत होतात तेव्हा ते तांडव करतात, हे नृत्य म्हणजे विनाशाचा प्रकार मानला जातो. तेव्हा तुमच्या घरात शक्यतो नटराजाची मूर्ती ठेवणे तुम्ही टाळायला हवे.