वेदांताच्या वादात आता शिरसाटांची उडी, करणार गौप्यस्फोट !

वेदांता प्रकल्प गुजरातला पळवला आणि महाराष्ट्रातील तरुणांच्या नोकऱ्या गेल्या यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपप्रत्योरोपांच्या फैरी झाडल्यात.चोहोबाजूंनी आरोपांच्या फैरी झडत असताना आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची या प्रकरणात एन्ट्री झालीय. वेदांता प्रकल्प कुणामुळे गेला आणि का गेला? याचा लवकरच खुलासा करणार असल्याचा इशारा दिलाय. आता शिरसाट नेमका काय खुलासा करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला यासाठी मविआ सरकार जबाबदार असून विशेष करुन आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई जबाबदार असून, हा प्रकल्प कुणामुळे गेला त्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे शिरसाटांनी म्हटले आहे.
दरम्यान, नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या नेते आणि उपनेतेपदाची याद जाहीर केली. त्यातून शिरसाटांचे नाव वगळ्यात आले आहे. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांना उपनेतेपदावरून डावलण्यात आल्याने शिरसाटांचा पत्ता पक्षातून कट केला जातोय का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आपण नाराज नसल्याचे शिरसाटांनी स्पष्ट केले आहे.