महाराष्ट्र नको, गुजरातला प्रकल्प उभारु, सल्ला कुणाचा?

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रा बाहरे का गेला, महाराष्ट्रातील रोजगार गुजरातने पळवला यावरुन आरोप प्रत्योरोप सुरु आहेत. महाराष्ट्राचं राजकारण हा प्रकल्प हातचा गेल्यामुळे तापलेलं आहे. भाजप शिंदे गटाचं सरकार येताच महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल महाविकास आघाडीचे नेते सरकारला करतंय. दरम्यान वेदांता समुहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड का केली? याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय.

हा प्रकल्प गुजरातला जाणे हा एक व्यावसायिक निर्णय होता. त्यासाठी फॉक्सकॉनच्या व्यवस्थापन सल्लागार फर्म सोबत तज्ज्ञांची टीम स्थापन करण्यात आली होती. त्या टीमने पाच-सहा राज्यांना भेट दिली. प्रत्येक राज्याने सर्व सोईसुविधा देऊ केल्या आणि आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी ऑफर केल्या. मला या सगळ्यांमध्ये गुजरातची निवड का केली याविषयी काही बोलायचे नाही. पण आम्हाला वेळेचे बंधन होते आणि आम्हाला वेगाने निर्णय घ्यायचे होते असे अनिल अग्रवाल यांनी सांगितले आहे. दरम्यान हा प्रकल्पासाठी महाराष्ट्राऐवजी गुजरातची निवड का केली? सल्ला कुणाचा सांगायला वेदांताच्या अध्यक्षांनी नकार दिलेला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.