Video – “…तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचं नाही”; शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर

यंदा होणारा दसरा मेळावा हा अभूतपूर्व आहे असेच म्हणावे लागेल कारण एकचा पक्षाचे दोन गट वेगवेगळ्या मैदानार दसरा मेळावा घेवून विचारांचे सोने लुटणार आहेत. शिवसेनेकडून ठाकरे गट तसेच शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेसुद्धा दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी केलेली दिसते आहे. आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे.

शिवरायांच्या शिकवणीची आठवण या टीझरमधून करून देण्यात आलेली आहे.तसेच जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही असे वक्तव्य असणारा टीझर शिवसेनेकडून रिलीज करण्यात आलेला आहे. शिवसेनेच्या दमदार टीझरमध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधीत करत असताना दिसत आहेत.याआधीही शिवसेनेने दसरा मेळाव्यानिमित्त टीझर रिलीज केले असून त्यात निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनचा वापर करण्यात आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.