विक्रम-वेधाचा ट्रेलर पाहिला का? हृतिकच्या गेमचा शोध घेताना दिसला सैफ!!

अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा सिनेमा ‘विक्रम वेधा’ची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असून त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये हृतिक आणि सैफची धमाकेदार ऍक्शन पहायला मिळतेय.मुळ चित्रपटात माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आहे पण आपले बॉलिवूडस्टार पण काही कमी नाहीत. ऍक्शन, डायलॉग आणि म्युझिकमुळे सिनेमाची जोरदार चर्चा आहे.
‘विक्रम वेधा’च्या ट्रेलरची सुरुवात हृतिक रोशनपासून होते. यानंतर सैफ अली खानची एक झलक पाहायला मिळत आहे. तसेच एक उत्तम पार्श्वसंगीत सुरु आहे, जे लोकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. त्यानंतर हृतिक एका फाईट सीनमध्ये अॅक्शन करताना दिसत आहे, तर दुसरीकडे सैफ अली खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या सहकार्यांच्या बरोबरीने तो गुंडांशी सामना करताना दिसत आहे. राधिका आपटे या चित्रपटात सैफच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यात ती एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे.
गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने विक्रम वेधा चित्रपट तयार झालाय. ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.