मेटेंच्या मृत्यूचा खुलासा कधी होणार?

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे १४ ऑगस्ट रोजी अपघातात निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्यांचा अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.हा अपघात आहे की घातपात असाही प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरु केला असून मेटेंच्या कार चालकालची सखोल चौकशी सुरु आहे.
भातण बोगद्याजवळ मेटेंच्या गाडीला अपघात झाला होता. ज्या आयरश ट्रकने मेटेंच्या गाडीला धडक दिली तो ट्रक आणि त्या ट्रकचा चालक पोलिसांच्या ताब्यात असून त्याची सखोल चौकशी सुरु आहे. दरम्यान असे समजते आहे की मेटेंचा चालक वारंवार आपला जबाब बदलतो आहे. तेव्हा ट्रक चालक आणि मेटें यांचा चालक एकनाथ कदम याची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. एकनाथ कदम याच्यावर कामोठे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुळचा बीड जिल्ह्यातील असणारा कदम तीन वर्षांपासून मेटेंकडे चालक म्हणून काम करतोय. मेटेंच्या अपघाताची माहिती त्यानेच पहिल्यांदा पोलिसांच्या कुटुंबियांना दिली होती.
पोलिसांची सुत्र वेगाने फिरत असून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचीदेखील चौकशी सुरु आहे. दरम्यान मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी देखील आमच्यापासून काहीतरी लपवलं जात आहे असं म्हटलेलं आहे. ३ ऑगस्ट रोजी एका गाडीने आणि ट्रकने मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला होता असा संशय मेटेंच्या पत्नीने व्यक्त केला आहे. सत्य सगळ्यांसमोर आले पाहिजे असी मेटे कुटुंबाने मागणी केली आहे.
शिवसेना खासदार अरविंद शिंदे यांनी देखील मेटेंच्या अपघाती निधनावर संशय व्यक्त केला आहे. मेटे यांची ४ वाजता बैठक होती मग अचानक सकाळी त्यांनी कोणी बैठकिसाठी बोलावलं. वेळ कोणी बदलली कोणाच्या हट्टापायी ही वेल बदलण्यात आली याती सखोल चौकशी व्हावी अशी अरविंद भोसलेंनी मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी एक समिती नेमलेली असून त्याद्वारे ही मेटेंच्या अपघाती निधनाचं सत्य नक्की काय आहे ते समजेल अशी आशा आहे.