तावडेंना प्रमोशन तर पंकजा मुंडे यांना पुन्हा झटका?

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर काम करायला सुरुवता केलीय. १५ राज्यांसाठी प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये भाजपने मोठे फेरबदल केलेले आहेत. तसं पाहिलं तर चंद्रशेखर बावांकुळे असो की राम शिंदे भाजपने त्यांचे पुनर्वसन केले पण पंकजा मुंडे यांच्याबाबतीत काय होणार असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाजपने मोठे फेरबदल केले आहेत. ज्यांना विधानसभेचं साधं तिकीट दिलं नव्हतं त्या विनोद तावडेंना डबल प्रमोशन देण्यात आलंय. पण अडीच वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना मात्र तिथेच ठेवण्यात आलंय. २०२४ लोकसभेची तयारी पाहात भाजपकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आलेय. ज्यांना अडीच वर्षात काहीच मिळालं नव्हंच त्यांच्यावर २०२४च्या मिशनची जबाबदारी देण्यात आलीय. ज्यांना विधानसभेचे तिकीट मिळालं नाही त्या चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलंय. तर विधानसभेला पराभूत झालेला राम शिंदे यांना तर विधान परिषदेचे आमदार आणि सोबतच मिशन बारामतीची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
विनोद तावडे यांच्यावरसुद्धा पक्षश्रेष्ठींकडून मोठा विश्वास टाकण्यात आलाय. हरीयाणाचे प्रभारी असणाऱ्या तावडेंवर बिहारच्या प्रभारीपदाची जबबादारी देण्यात आलीय. तुम्हाला माहित असेल गेल्या महिन्यातच नितीशकुमार यांनी बंड केल्यामुळे भाजपची बिहारमधील सत्ता गेली. अशा संकटकाळाता महाराष्ट्राच्या विनोद तावडेंना मिळालेली जबाबदारी म्हणजे हायकमांडचा खास विश्वासाची पावती असंच म्हणायला हवं.
राज्यसभेचं तिकीट नाकारल्यानंतर आता प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारीपद देण्यात आलंय. तर राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून औरंगाबादच्या विजया रहाटकर यांना पाठवलंय. तावडेंना मोठ्या राज्याचे प्रभारीपद दिलंय तर जावडेकर आणि रहाटकरांना नव्याने जबाबदारी दिलेली आहे. पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मात्र त्यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभागी म्हणून कायम ठेवण्यात आलंय.पंकजा यांना मुरलिधर राव यांच्या नेतृत्वात काम करावं लागणार आहे. विनोद तावडेंच्या जबाबदारीत वरटेवर वाढ होते आहे पण पंकडा मुंडे मात्र जिथे आहेत तिथेच आहेत.
फडणवीस सरकारमधील मंत्री राम शिंदे, बावनकुळे आणि विनोद तावडे यांची पिछेहाट झाली होती. पण आता त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून जबाबदारी वाढविण्यात आलेली आहे. पण पंकजा मुंडे यांच्याबाबतीत मात्र हायकंमाड प्रमोशन देण्याच्या मुडमध्ये नाहीत अशी चर्चा सुरु झालीय. भाजपमधील या बदलामुळे भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना भविष्य आहे का असा प्रश्न निर्माण झालाय.