Video :…अन् मोदींसोबत जाऊ पाहणाऱ्या भाजपाध्यक्षांना अमित शाहांनी बाजूला ढकललं !

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल ते सांगता येत नाही. नेटकरी कायम वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल करत असतात त्यावर अतरंगी कमेंट सुद्धा होताना दिसतात. राजकीय व्यक्ती किंवा सिने-नाट्य मालिका यातील कलाकार यांचे अनेक व्हिडीओ दररोज शेअर होतात पण राजकिय क्षेत्राच्या संबंधातील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. हा व्हिडीओ केंद्रातील तीन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीसंबंधातील आहे.
हा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आहे.पंतप्रधान मोदी अमित शाह आणि जेपी नड्डा चालत आहेत. तेव्हा चालताना जेपी नड्डा अमित शाहांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत तेवढ्यात अमित शाह यांच्या हाताला धरुन त्यांना बाजूला ढकलतात असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ते जातात नड्डा यांना काही बोलत आहेत असेही दिसत आहे.
काँग्रेस अध्यक्ष बद्दल गुल्लू मीडिया आणि BJP खूप चर्चा करत आहे. पण स्वतःच्या अध्यक्षाला शाह “हो कि बाजूला” म्हणत आहे 😂🤣 pic.twitter.com/BaqpjVls5a
— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) September 23, 2022
या व्हिडीओवर काँग्रेसचा लोगो अगदी स्पष्ट दिसतोय त्यामुळे तो काँग्रेसने शेअर केला आहे यात शंकाच नाही. या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत त्यातील काही चांगले आहेत तर काही टीका करणारे आहेत.काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.