विवेक अग्निहोत्री यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आहे. कुणाचंही नाव न घेता त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांच्या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत आपलं मत मांडलं आहे.
सुप्रीम कोर्टाने नुपूर यांना सुनावल्यानंतर विवेक यांनी ट्विट करत लिहिलं, ‘इथे अन्याय झाला आहे त्या व्यक्तींना आणखी अपमानित करणं योग्य समजलं जातंय.’ नेटकरी त्यांच्या या ट्विटचा संबंध नुपूर यांच्या प्रकरणासोबत जोडत आहेत. सोबतच गीतकार मनोज यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज यांनी ट्विट करत लिहिलं, ‘सुप्रीम कोर्टाने असं म्हटल्यामुळे नुपूर यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.’
विवेक यांच्या ट्विटवर अनेक युझर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिलं, ‘सुप्रीम कोर्टाने एका बाजूनेच निर्णय दिला. त्यांनी दुसऱ्या बाजूच्या लोकांना देखील सुनवायला हवं होतं. वाईट शब्द दुसऱ्या बाजूने देखील बोलले गेले आहेत. हे एकतर्फी होऊ शकत नाही.’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘या अतिशय तत्परतेने निर्णय देणाऱ्या न्यायव्यवस्थेमुळे आणि अतिशय संथपणे चालणाऱ्या सरकारमुळे हिंदूंचं अस्तित्व संपायला फक्त ५ ते १० वर्ष लागतील. हिंदूंचा या जगात कोणताच देश असणार नाही. याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसेल.’