सुप्रिया सुळेही बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत? काय आहे ‘या’ फोटोमागचं सत्य?

सोशल मीडियावर काल मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचा फोटो व्हायरल झाला आणि राज्यात खुर्चीच राजकारण रंगात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले आहेत असा फोटो व्हायरल करत त्यांना सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्पष्टीकरण आलं होतं. आता हे प्रकरण येथे थांबेल असे वाटत असताना आज शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो ट्विट केला. मग काय पुन्हा एकदा खुर्चीचे राजकारण रंगात आले.
हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? pic.twitter.com/8UUb5VzMQR
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 23, 2022
शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातला फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या दिसत आहे. त्यांच्या शेजारी त्यावेळी आरोग्य मंत्री असलेले राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतंय.ठाकरे सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावर ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न विचारत शीतल म्हात्रे यांनी फोटो ट्विट केलाय.
… आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस @MahaCyber1 @MumbaiPolice https://t.co/XU5Bi3AHPq pic.twitter.com/TWkwbmPONv
— Aditi Nalawde (@adi_nal) September 23, 2022
आता फोटो ट्विट झाला तर प्रतिक्रिया येणारच, नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत त्यात राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचे म्हटले आहे आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. … आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत असेही म्हटले आहे.
या वादात काँग्रेसनेसुद्धा प्रतिक्रिया दिलीय.युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रवीणकुमार बिरादार यांनीही याच फोटो संदर्भात ट्विट करत ओरिजनल फोटो काय आहे आणि त्याचं मॉर्फिंग कसं केलं गेलं आहे ते ट्विट केलं आहे.
वाण नाही पण गुण लागला 🤦♂️
— Pravinkumar Biradar (@PravinIYC) September 23, 2022
शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे.
हा घ्या पुरावा 👇 https://t.co/1ZiAKIAeyA pic.twitter.com/9gN1mVoZL6
श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. तरीही शीतल म्हात्रे यांनी एक फोटो ट्विट केला मात्र या फोटोमागे नेमकं सत्य काय आहे ते या बातमीवरुन आपल्याला समजले असेलच.