उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन होवून एक महिन्याहून अधिक कालावधी झालेला आहे. तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेकवेळा दिल्लवारी करुन आलेले आहेत. अगदी उपमुख्यमंत्री फडणवीससुद्धा दिल्लीला जावून आले आहे. दोघांनी मिळून २५ दिवसात ४ दिल्ली दौरे केले तरी मंत्रिमंडळ विस्तार कुठे रखडला असा प्रश्न पडलेला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी हाच प्रश्न सध्या सगळ्यांना सतोवता आहे. दरम्यान सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा भाषण करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. त्या भाषणात फडणवीस म्हणतायेत,‘महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिना मंत्र्यांचाच निर्णय करता येत नाही अशा प्रकारची नामुष्की ही कुठल्याही सरकारवर आली नाही.’
फडणवीस यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. फडणवीस यांच्या मागे लावलेला बॅनरवर पालघर जिल्हा असे लिहीलेले आहे त्यामुळे तिथे झालेल्या जाहिर सभेत फडणवीस भाषण करत आहेत हे समजते. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपवर नाराज आहेत अशा ही कमेंट नेटकरी करत आहेत.