पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा, ‘या’ तारखेपासून पाणीकपात  

पुणे शहराचा पाणी पुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत असणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाण्याची पातळी खालावली असल्यामुळे पाणी कपात करण्याबद्दल पुणे महापालिकेने पाणी कपात करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सोमवार अर्थात ४ जुलैपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तो पुढील आठ दिवसांसाठी म्हणजे ११ जुलै पर्यंत दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येईल. या कालावधीत पडणारा पाऊस आणि धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पाणी वितरण व्यवस्थेचे पुढील नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणीकपात ८ दिवसांसाठी

सध्या सर्व भागांमध्ये वर्तमान वेळेतनुसार मात्र एकाआड एक दिवस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक https://www.pmc.gov.in/sites/default/files/water_supply_timetable.pdf

या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. ११ जुलै पर्यंतच्या पाणीपुरवठ्याच्या या वेळा आहेत याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

खडकवासला धरणात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेला घ्यावाच लागणार होता. परंतु आयुक्त प्रशासक विक्रम कुमार अध्यक्ष म्हणून असणाऱ्या या बैठकीला विलंब होत होता. जलपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंबंधीची माहिती घेतली.

सध्या प्रतिदिन १ हजार ६५० दशलक्ष लिटर इतकं पाणी वापरण्यात येतं. त्यात ३० टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज सरासरी १ हजार २०० दशलक्ष लिटर पाणी वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ४५० दशलक्ष लिटर पाण्याची कपात केल्यामुळे काही भागात पाणीटंचाई जाणवू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.