निवडणूक आयोगाचा ठाकरेंना धक्का; उद्धव ठाकरेंकडून दोन शब्दांत इरादा स्पष्ट

शनिवारी रात्री निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याचा अंतरिम निर्णय जाहीर केला. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे असे म्हटले जाते आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडातून नव्याने उभारी घेऊ पाहत असलेल्या शिवसेनेसाठी आता कसोटीचा काळ आहे. खरंतर निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार असे अनेकांना अपेक्षित होते फक्त शिवसेनेलाच मोठा धक्का बसेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, निवडणूक आयोगाने शिंदे गटाची देखील गोची केली कारण शिंदे गटाला सुद्धा धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव तात्पुरते वापरता येणार नाही असा निर्णय दिला.
निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात जिंकून दाखवणारच असे दोनच शब्द लिहीले असून शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो या पोस्टमध्ये दिलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे, या पोस्टवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडलेला आहे.
शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी गद्दारांनी चिन्ह गोठवण्याचा नीच प्रकार केला असे म्हणत शिंदेगटावर घणाघात केला होता. आता आदित्य यांनी देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हरिवंशराय बच्चन यांची प्रसिद्ध कविता पोस्ट केलीय.आदित्य यांच्याकडून अग्निपथ कविता पोस्ट करण्यात आली आहे. उद्धव आणि आदित्य यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता पिता-पुत्र जोरदार संघर्ष करण्याच्या मनस्थितीत आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.
शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हा गोठवलं जाऊ शकतं आणि नव्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते अशी मानसिक शिवसेनेने तयार केली होती अशी चर्चा शिवसेनेच्या गोटातून समजली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना फारसा धक्का बसलेला नाही. कारण हा निर्णय तसा अपेक्षितच होता. मात्र, शिवसेना हे नाव वापरायलाही आयोगाने बंदी घातल्यानं उद्धव ठाकरे यांच्यासमोर भलामोठा पेच उभा राहिला आहे हे तेवढेच खरे आहे.
दुसरीकडे शिंदे गटाला सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे धक्का बसलेला आहे. आता शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरता येणारा नाही. आत्तापर्यंत शिंदे गटाकडून सातत्याने आम्ही बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेचे विचार पुढे नेत आहोत, असा प्रचार केला जात होता. मात्र, आता शिवसैनिक असे म्हणणे कसे थांबवता येईल हा प्रश्नआहेच. यावर ठाकरे गट आणि शिंदे गट काय मार्ग काढणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
Sangharsh Karenge geet Hamari Hogi