विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अलर्ट !

मुंबई पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याकडून पावासाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. अगदी नाशिक आणि पालघर येथेही वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. चंद्रपूर -गडचिरोली मार्गावर पाणी साचल्यामुळे प्रवासासाठी मार्ग बंद करण्यात आलेला आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण परिसरात पावसाचा जोर पहायला मिळतो आहे. मुसळधार पावसामुळे पाळे खुर्द-असोलीला जोडणारा रस्ता वाहून गेलेला आहे. या गावासाठी तो एकमेव रस्ता होता मात्र तो वाहून गेल्यामुळे दळणवळणच ठप्प झालेले आहे.बंधारा फुटल्यामुळे सर्व पाणी वाहून गेलेलं आहे.जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.