भाजपची डोकेदुखी..दसऱ्यापूर्वी मोठा धमाका, शिंदे-ठाकरेंमध्ये काय शिजतंय?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली. आपली शिवसेना खरी शिवसेना असं म्हणत एकीकडे ठाकरे यांच्याबोरबर त्यांची जोरदार लढाई सुरु आहे. तर दुसरीकडे सरकार चालवण्याची कसरत देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने ते करत आहेत.दरम्यान एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळ जाताना पहायला मिळत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक पहायला मिळाली होती. शिंदेंची मनसेसोबतची जवळीक ही भाजपसाठी डोकेदुखी आहे अशी चर्चा दिल्लीच्या राजकारणता रंगते आहे. दरम्यान दसऱ्याआधी मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रत सरकार स्थापन झालं खरं पण ते टीकवावं कसं या चिंतेत भाजप पक्षश्रेष्ठी आहेत.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कणा मोडणं हे भाजपचे मुख्य उद्दीष्ट असून गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच मुंबईला भेट दिली. त्यावेळी त्यांनी भाजपाचा इरादा स्पष्ट केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शत्रू नंबर एक आहेत अशी गर्जनासुद्धा शाह यांनी केली.

आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ही नव्याने स्थापन झालेल्या सरकारसाठी मुख्य कसोटी असेल याची कल्पना भाजपाला आहे.मुंबईमध्ये भाजपाने दोनदा पाहणी केलेली आहे पण त्यातून दिसणारा कल हा पक्षासाठी फारसा उत्साहवर्धक नसल्याचं दिसून आलंय अशी माहिती हाती आलीय.या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजप वेगवेगळी समीकरण मांडू पाहतंय. यासाठी मनसेला आघाडीत सामील करून घेण्यासाठी विचार सुरु आहे. शिंदे गट आणि मनसे यांचे विलीनीकरण करुन राज ठाकरेंना महत्त्वाची भूमिका देणे असे ते सूत्र असू शकते. 

गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरे यांच्या घरी जावून आले. या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे अशी चर्चा तर आहेच. मुख्यमंत्री पदी शिंदेच राहतील पण राज ठाकरे प्रभावी वक्ते असून सेनेच्या दोन्ही गटात ते चैतन्य निर्माण करु शकतात. राज ठाकरे यांच्या चिरंजीवांना विधानपरिषदेचं सदस्यत्व दिलं जावू शकतं तर शिंदेंच्या सुपुत्राला पुढे कधीतरी केंद्रांच्या मंत्रिमंडळात स्थान देता येईल अशी समीकरण मांडली जात असल्याची माहिती हाती आलेली आहे. समजा मुंबई महापालिकेचा निकाल विरोधात गेला तर काय परिणाम होईल याची कल्पना भाजपला पुरेपुर आहे. पहिल्या टप्प्यात अनेक अडचणी आहेत यातून मार्ग काढण्यासाठी शिंदे कदाचित दिल्लीवारीसुद्धा करु शकतात. तेव्हा आता भाजप आणि शिंदे गटाकडून काय पावलं उचलली जातात आणि मनसे यात काय करते तसेच शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येतात का ते येणाऱ्या काळात समजेलच. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.