शिंदे BKC वर तर शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे? हे आहेत 4 पर्याय !

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होतो पण आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट दोघेही दसरा मेळावा घेणार आहेत. शिवाजी पार्कसाठी महापालिकेकडे दोघांनी परवानगी मागितली होती पण कायदा-सुव्यवस्था पाहता दोघांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. दोन्ही गट दसरा मेळावा मैदानासाठी कोर्टात गेलेत त्यावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. 

दरम्यान शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी आधीच मिळालेली आहे. मग आता प्रश्न आहे शिवसेना दसरा मेळावा कुठे घेणार? सगळ्या राज्याचे लक्ष याकडे लागलेले आहे. शिवाजी पार्कवरील मैदानाची परवानगी नाकारली तर शिवसेनेसमोर काय पर्याय असणार? असा सवाल केला जातोय. जर परवानगी मिळाली नाही तर शिवसेना ऑनलाईन मेळावा घेणार का असे काहीजण म्हणत आहेत. तर शिवसेना दुसरे मैदान शोधतेय असे काहींचे म्हणणे आहे.

समजा शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेला मेळावा घेता आला नाही. तर शिवसेनेसमोर काही पर्याय आहेत त्यात गोरेगावचे नेस्को मैदान आहे जिथे काल गटप्रमुखांचा मेळावा झाला. दुसरा पर्याय म्हणजे महालक्ष्मीचं रेसकोर्स मैदान तर तिसरा पर्याय म्हणजे आझाद मैदान असे सुत्रांचे म्हणणे आहे.तेव्हा आता शिवसेनेचा दसरा मेळावा कोणत्या मैदानावर होणार ते लवकरच समजेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.