WhatsApp च्या डेस्कटॉप युजर्ससाठी ‘हे’ जबरदस्त फिचर लॉन्च

सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणजे व्हाट्सअ‍ॅप होय. ग्राहकांसाठी व्हाट्सअ‍ॅप अनेक नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. गेल्या काही दिवसांत व्हाट्सअ‍ॅपने अनेक नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत.

मेटाने डेस्क्सटॉप वापरकर्त्यांसाठी WhatsApp Desktop App लॉन्च केले आहे. WhatsApp हे App विंडोजसाठी लॉन्च केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत इंस्टाग्राम आणि फेसबुक पोस्टद्वारे अधिकृत घोषणा केली आहे.मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये असे सांगितले की, नवीन WhatsApp डेस्कटॉपद्वारे विंडोज वापरकर्ते एकाच वेळी ८ लोकांसोबत व्हिडिओ कॉलमध्ये सामील होऊ शकतात. तसेच ३२ जण ऑडिओ कनेक्ट होऊ शकतात. यामधील सर्वात खास बाब म्हणजे हे App मेसेजिंग, मीडिया आणि कॉलसाठी सुधारित एन्क्रिप्शन आणि नवीन फीचर्स, एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर्ससह येणार आहे.

व्हाट्सअ‍ॅपचे नवीन डेस्कटॉप App मध्ये अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. या डेस्कटॉप App मध्ये लिंक प्रिव्हयु आणि स्टिकर्सचे फिचर देण्यात आले आहेत. तसेच तुम्ही ते Microsoft Store ला भेट देऊन ते डाउनलोड करू शकता. याशिवाय व्हाट्सअ‍ॅपच्या https://www.whatsapp.com/download या वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.