सावधान ! +92 कोडवरुन येणारे कॉल घेतले तर…..

जगभरात सर्वाथ जास्त वापरले जाणारे मेसेजिंग ऍप कोणते असेल तर ते आहे व्हॉट्सअॅप सामान्य व्यक्तीपासून श्रीमंतापर्यंत सगळेजण व्हॉट्सअॅपचा वापर करत असतात. सुप्रभात मेसेज पासून ऑफिसची सगळी कामे देखील व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केली जात आहेत. याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतो आहे पण अनेकजण व्हॉट्सअॅपचा वापर फ्रॉड करण्यासाठी करत आहेत. त्यामुळे आपण खबरदारी घ्यायला हवी.
गेल्या काही दिवसात व्हॉट्सअॅपवर एक नवा स्कॅम पाहण्यात आला आहे. अनेक वापरकर्त्यांना +92 असा मोबाईल कोड असणाऱ्या नंबरवरुन फोन येतो आहे. समोरील व्यक्ती तुम्ही बक्षिस जिंकल्याचे सांगते आहे. या भुलथापांना बळी पडून आपण आपली वैयक्तिक माहिती त्या व्यक्तीला देतो आहोत आणि परीणामी आपल्यााल खूप मोठे आर्थिक नुकसान होते आहे.
व्हॉट्सअॅपच्या लोकप्रियतेचा फायदा घेवून स्कॅमर्स आपले काम करत आहेत. अनेकांना माहित असेल +92 हा पाकिस्तानचा कंट्री कोड आहे त्यामुळे हा फोन पाकिस्तानातून येतो आहे असे म्हटले जाते आहे. पण तज्ज्ञांच्या मते असे नंबर व्हर्चुअली देखील उपलब्ध करून दिले जातात.त्यासाठी तुम्हाला त्या देशात जाण्याची गरज नाही. त्यामुळे +92 या कोडवरून येणारा नंबर पाकिस्तानातील आहे असे आपण ठामपणे सांगू शकत नाही,
समजा तुम्हाला +92 या कंट्री कोड नंबरवरून व्हॉट्सअॅपवर कॉल आला तर काय करायचे एकतर तुम्ही या कॉलकडे दुर्लक्ष करावा. तो कॉल घेवूच नये.त्या कॉलला तुम्ही ब्लॉक करु शकता.+92 हा कंट्री कोड कायम लक्षात ठेवा यावरून आलेला कॉल आणि मेसेज म्हणजे तुमची फसवणूक आहे हे ध्यानात राहू दे.तुम्ही या नंबरची तक्रार करु शकता. सर्विस प्रोव्हाडर कंपन्यांनी तशी सोय केलेली आहे किंवा तुम्ही सायबर सेलची मदत घेवू शकता. आपल्या देशाचा कोड +91 आहे. या व्यतीरिक्त जर अनोळखी नंबरवरून कॉल आला तर त्याला उत्तर न देणे किंवा मेसेजला रिप्लाय न करणे हे लक्षात ठेवा. तंत्रज्ञानातील प्रगती फायद्यासाठी होते आहे तोपर्यंत चांगले आहे पण काही समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत आहेत.