आता चॅटिंग करताना तुम्ही ऑनलाइन दिसणार नाही, Whatsapp चे नवे फिचर पाहिले का?

तुम्हाला कोणाला मेसेज करायचा असेल किंवा चॅटींग करायचे असेल तर कोणते ऍप तुम्ही वापरता असे विचारले तर आपण पटकन सांगतो व्हॉट्सअॅप ! जगभरात व्हॉट्सअॅपच सर्वात जास्त वापरले जाते. आता व्हॉट्सअॅपवरचे चॅटीगं अधिकच सुरक्षित झालेले आहे. मेटाचे सीईओ आणि संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपमधील प्रायव्हसी फीचरची घोषणा नुकतीच केलेली आहे. व्हॉट्सअॅप युजर्सच्या सुरक्षेचा विचार करून तीन नवीन प्रायव्हसी फीचर्स लवकरच येणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
नवीन फीचरनुसार, तुम्ही कोणालाही न सांगता ग्रूप सोडू शकता. आत्तापर्यंत कसं होतं आपण एखादा ग्रूप सोडला तर प्रत्येकाला समजत होतं या व्यक्तीने ग्रूप सोडला आहे.पण आता आलेल्या नव्या फिचरमुळे आता कोणालाही समजणार नाही की तुम्ही ग्रुप सोडलेला आहे. फक्त जो ग्रुप ऍडमीन आहे त्याला समजेल कोणी ग्रुप सोडलेला आहे.
आता तुम्ही व्हॉट्सअॅपचा स्टेटस इंडिकेटर नियंत्रीत करु शकता. कोणाबरोबर ऑनलाईन स्टेटस शेअर करायचे आहे ते तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला कोण ऑनलाइन पाहू शकेल आणि कोण पाहू शकत नाही हे नियंत्रीत करणे आता तुमच्या हातात असणार आहे. या फिचरमुळे तुम्ही खासगी रित्या व्हॉट्सअॅप वापरु शकता.
नवीन फिचरनुसार WhatsApp व्हू वन्स मेसेज तुम्ही एकदाच पाहू शकता. आता स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे नवे फिचर व्हॉट्सअॅप लाँच होणार आहे.या फिचर नुसार तुम्ही स्क्रीनशॉट ब्लॉक हा पर्याय निवडू शकता. यामुळे WhatsApp व्हू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट युझर घेऊ शकणार नाही. WhatsApp संदेश खासगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी या फिचरमुळे मदत होणार आहे असे मत मार्क झुकरबर्ग यांनी व्यक्त केले आहे.