‘व्हॉट्सॲप’मध्ये येते आहे नवीन अपडेट !!

संवादासाठी सर्वात जास्त वापरले जाणारे ॲप म्हणजे व्हॉट्सॲप, यात अनेक नवनवीन फीचर येत असतात. आता लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये एक नवे फिचर येणार असून ते कॅमेरा संदर्भात आहे. अनेक वेळा आपण व्हॉट्सॲपमध्ये थेट कॅमेऱ्यातून सेल्फी फोटो किंवा व्हिडिओ एखाद्यासोबत शेअर करतो. तेव्हा कॅमेराचा शॉर्टकट बार खालच्या बाजूला असतो. आता कंपनी त्यात बदल करण्याच्या तयारीत आहे. WhatsApp लवकरच मुख्य ॲपच्या इंटरफेसमध्ये कॅमेरा शॉर्टकट देण्याची तयारी करते आहे. या नवीन अपडेटनंतर व्हॉट्सअॅपमधील कॅमेऱ्याचा शॉर्टकट सर्वात वरच्या सर्च बारवर आपल्याला दिसेल. सध्या कंपनी याची ट्रायल घेते आहे. याशिवाय व्हॉट्सॲप एका कम्युनिटी फीचरवरही काम करते आहे.

WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरबदद्ल माहिती दिली आहे. Android च्या बीटा व्हर्जन 2.22.19.7 वर देखील ते वापरले जाऊ शकते. नवीन बीटा व्हर्जन Google Play Store वरुन तुम्ही अपडेट करु शकता. जिथून बीटा युजर्स ते डाउनलोड करू शकतात. एका नवीन अहवालानुसार, व्हॉट्सॲप एका फीचरवर काम करत आहे ज्यानंतर व्ह्यू वन्स किंवा डिसपिअरिंग मेसेजचे स्क्रीनशॉट घेणे शक्य होणार नाही.नवीन फिचरचे टेस्टिंग सुरु असून लवकरच त्यात अपडेट पहायला मिळती,

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.